Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Marathwada › 38 दिवसांपासून धरणे

38 दिवसांपासून धरणे

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:27PMबीड : प्रतिनिधी

जिल्ह्यातील नगर पालिकांमधील सफाई कामगारांना किमान वेतन द्यावे, त्यांचे वेतन महिन्याच्या 10 तारखेला करावे यासह इतर मागण्यांसाठी रोजंदारी मजदूर सेनेच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला 38 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. 

काही महिन्यांपूर्वी याच महिलांनी 78 दिवस आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याने या महिलांनी पुन्हा धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. 

बीड नगरपालीकेसह जिल्ह्या तील इतर नगरपालिकेत सफाई कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. सफाई कामगार अनेक कारणांसाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आंदोलन करीत आहेत. सफाई कामगारांना नियमाप्रमाणे वेतन देण्याची मागणी आहे. सफाई कामगार महिला 38 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. यानंतर अद्यापही या महिलांना न्याय मिळालेला नाही. सदरील संघटनेच्या नोंदणी संदर्भात कागदोपत्री देण्यात आली आहेत. यानंतरही पुन्हा संस्थेच्या दस्तावेजाची मागणी करून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप भाई गौतम आगळे यांनी केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनास 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालून दालनासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.