Sun, Nov 18, 2018 21:55होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण; लातूरात कडकडीत बंद

मराठा आरक्षण; लातूरात कडकडीत बंद

Published On: Jul 24 2018 12:13PM | Last Updated: Jul 24 2018 12:13PMलातूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती क्रांतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला लातूरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळी सात पासून राजीव गांधी चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. मोटारसायकल रॅलीतून समाज बांधवानी नागरिकांना बंदची हाक दिली. त्यास लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा महाविद्यालये बंद होती. 

सकाळी अकरा वाजता मराठा क्रांती भवना समोर हजारोंच्या उपस्थितीत काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. काकासाहेब शिंदे अमर रहे है च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सरकार व मराठा लोकप्रतिनिधीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

सुरक्षेच्या कारणाहून एकही एस. टी. बस स्थानकाबाहेर निघाली नाही. स्थानकात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलकांच्या मागे पोलिस व्हॅन होत्या.