Thu, Sep 20, 2018 14:20होमपेज › Marathwada › मायलेकाच्या मृत्यूनंतर चूल पेटलीच नाही

मायलेकाच्या मृत्यूनंतर चूल पेटलीच नाही

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:38AMभोकरदन : प्रतिनिधी

शहराजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात वालसा वडाळा येथील कमलबाई पवार व रवींद्र पवार हे मायलेक ठार झाल्याने त्यांच्या घरात आता लक्ष्मी राहिलीच नाही. महत्त्वाचे म्हणजे पवार कुटुंबीयांबद्दल गावात आदराचे स्थान असल्याने ऐन होळीचा सण असतानादेखील गावात कोणीच चूल पेटविली नाही. सर्वत्र शोककळा पसरल्याने पवारांच्या घरात आता फक्त तिघेच माणसे राहिले असून कमलबाई यांचे सासरे सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.

होळी व रंगपंचमीचा सण असल्याने सर्वत्र रेलचेल दिसून येत होती. वालसा वडाळा येथील साहेबराव मारुती पवार यांच्या घरात त्यांचे वयोवृद्ध वडील मारुती पवार (वय 75), त्यांची पत्नी कमलबाई साहेबराव पवार, रवींद्र व विलास हे दोन मुले असा पाच लोकांचा परिवार होता. सणा निमित्त साहेबराव व त्यांची पत्नी कमलबाई, मुलगा रवींद्र हे गुरुवारी गावातीलच मित्राची नवी कोरी मोटारसायकल घेऊन काही कामासाठी भोकरदन शहरात आले होते. खरेदी झाल्यानंतर साहेबरावांनी कमलबाई व रवींद्र यांना मोटारसायकलवर  गावी जाण्यास सांगितले. शहरापासून काही अंतरावर येत नाही तोच झालेल्या अपघातात कमलबाई व तरुण मुलगा रवींद्र अपघातात ठार झाले.