Wed, Jan 23, 2019 23:19होमपेज › Marathwada › खासदार सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत तीव्र पडसाद

खासदार सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत तीव्र पडसाद

Published On: Dec 03 2017 7:37PM | Last Updated: Dec 03 2017 7:37PM

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

गुजरात राज्यातील राजकोट येथे काँग्रेसचे हिंगोली जिल्ह्याचे खासदार राजीव सातव यांना शनिवारी (दि. 2) रात्री पोलिसांनी केलेल्या अटक व मारहाणीचे तीव्र पडसाद रविवारी हिंगोली जिल्ह्यात उमटले. या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध करून मोदी व गुजरात सरकारचा पुतळा जाळला. तसेच काही ठिकाणी एस.टी. बसेसवरही दगडफेक करण्यात आली.

सोशल मीडियातून खा. राजीव सातव यांना अटक व मारहाणीचे वृत्त येताच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंगोलीतील गांधी चौकात निषेध नोंदविला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी औंढ्यातील औंढा-हिंगोली या राज्य महामार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळत भाजप सरकारचा निषेध केला. कळमनुरीतील बसस्थानक परिसरात कार्यकर्त्यांनी गुजरात सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. 

औंढ्यात भाजपच्या नगर पंचायतच्या अध्यक्षा दीपाली पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकामध्ये औसा ते अकोला बसवर अज्ञात कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. वसमत येथे काँग्रेसतर्फे गुजरात सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाभर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान  कळमनुरीतील काँग्रेस कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड भाजपच्या कार्यकरत्यांनी केल्याचे बोलले जात आहे.