Wed, Nov 14, 2018 08:04होमपेज › Marathwada › नांदेड : मोबाईल बॅटरीचा स्‍फोट दोन गंभीर जखमी

नांदेड : मोबाईल बॅटरीचा स्‍फोट दोन गंभीर जखमी

Published On: Apr 22 2018 8:13PM | Last Updated: Apr 22 2018 8:13PMमाहुर : प्रतिनिधी 

मोबाईल फोनची जुनी बॅटरी निकामी समजून दगडाने फोडत असताना अचानक स्‍फोट झाला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील बौद्धपुरा भागात आज (दि. २२) रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. 

शहरातील बौध्दपुरा प्रभाग क्र ७ मधिल गजानन भवरे यांची दोन मुले सिद्धार्थ (वय १६) व शिवम (वय १०) हे दोघे भाऊ अंगणात खेळत होते. यावेळी त्यांच्या हातात खराब मोबाईल फोनची बॅटरी लागली. कुतुहलापोटी सिद्धार्थने दगडाने बॅटरीवर ठेचण्यास सुरुवात केली. यावेळी बॅटरीचा अचानक स्‍फोट झाला. 

या अपघातात सिद्धार्थच्या उजव्या भागाच्या तोंडाचा जबडा स्‍फोटात छिन्‍न विछिन्‍न झाला. तसेच कान, खांदा आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तर जवळच खेळत असलेल्या शिवम याच्या उजव्या हाताच्या करंगळी आणि अंगळ्यास छिद्र पडले. 

स्‍फोटाचा आवाज ऐकूण त्याच्या वडिलांसह शेजार्‍यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. १०८ रुग्‍णवाहिकेद्वारे जखमी शिवम आणि सिद्धार्थ यांना तातडीने यवतमाळ येथे रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. मोबाईल बॅटरीबरोबर खेळताना झालेल्या या स्‍फोटामुळे शहरांत भीतीचे वातावरण आहे.