Tue, Apr 23, 2019 20:05होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांचा इशारा : संबर, पिंपळगाव टोंग येथील संपादित जमीन मोबदला प्रकरण 

मावेजासाठी आत्मदहनाचा इशारा

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 10:58PMपरभणी : प्रतिनिधी

निम्न दुधना प्रकल्पाच्या कामासाठी शासनाने खासगी व वाटाघाटीद्वारे जमिनी संपादित केल्या. पण, शासनाने काढलेल्या निर्णयास बगल देत भूसंपादन कार्यालयाने संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनीची रजिस्ट्री ही मागील निर्णय समोर ठेवून चुकीच्या पद्धतीने केल्याचे शेतकर्‍यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीत उघड झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून संपादित जमीन मोबदला प्रकरणात टाळाटाळ होत असल्याने संबर व पिंपळगाव टोंग येथील 76 शेतकर्‍यांनी न्यायहक्‍कासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन 1 जून रोजी माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 जायकवाडी वसाहत परिसरात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

जलसंपदा विभागाच्या वतीने दिलेल्या आश्‍वासनानंतर सदरील शेतकर्‍यांनी या कारवाईसाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. पण, अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यापूर्वी महाराष्ट्रदिनीही इशारा दिल्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी 5 एप्रिल रोजी नियमाप्रमाणे संपादित जमिनीचा मावेजा देण्याचे आदेशित केले होते. पण, यात वाढीव मावेजाची कार्यवाही झाली नसल्याने आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकर्‍यांनी संघर्ष सुरू केल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे संबर व पिंपळगाव टोंग येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांना 1 जून रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याच्या इशार्‍याचे निवेदन दिले आहे.  

निवेदनावर शेतकरी गंगाधर चव्हाण, सुहास पवार, सुनील पवार, कैलास चव्हाण, रमेश चव्हाण, श्रीधर चव्हाण, रंगनाथ काळे, छबाबाई चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, गंगासागर चव्हाण, पुंडलीक चव्हाण, किशन कंठाळे, ज्ञानोबा चव्हाण, बाजीराव चव्हाण, शशिकला चव्हाण, कल्याण चव्हाण, दादाराव पवार,शिवाजी बोबडे, कालिंदाबाई चव्हाण, भास्कर चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, रंगनाथ चव्हाण, वेणुबाई चव्हाण, इंद्रजित बोबडे, सदाशिव चव्हाण, दामोदर चव्हाण, रामराव काळे, बालाजी पवार, अमोल चव्हाण, नारायण चव्हाण, उत्तम चव्हाण, निवृत्ती चव्हाण, भगवान चव्हाण, गणेश झाडे, कुंडलिक झाडे, प्रकाश खटिंग, बन्सी झाडे यांच्यासह 76 शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.