Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › मराठा क्रांतीचे मोर्चाचे राज्यव्यापी जनांदोलन, सहयाद्रीवरील  चर्चा अमान्य 

मराठा क्रांतीचे मोर्चाचे राज्यव्यापी जनांदोलन

Published On: Jul 29 2018 8:10PM | Last Updated: Jul 29 2018 8:10PMलातूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाच्या मागण्याप्रती शासन गंभीर नसल्याचा आरोप करीत त्या मागण्या मार्गी लावण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जनांदोलन छेडण्याचा निर्णय रविवारी लातूर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ९ ऑगस्‍ट रोजी मराठा समाज बायकां,  मुले गुरांढोरासंह रसत्यावर बैठक देतील, राज्यातील सर्व व्यव्हारही बंद राहतील अशी माहिती क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली. राज्याच्या २२ जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चोचे समन्वयक उपस्थित होते. जिजाऊ वंदनेने बैठकीस सुरुवात झाली. मराठा आंदोलनात शहीद झालेल्या समाज बांधवाना व आंबेनेली अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्या माहित आहेत. त्यामुळे त्यांनी चर्चेची अपेक्षा न ठेवाता ठोस निर्णय घ्यावेत असे सुचवत सह्याद्रीवर झालेल्या बैठकीचा या बैठकीत निषेध करण्यात आला. सरकारसशी हातमिळवणी करणाऱ्यांचा मराठा क्रांतीशी कसलाही संबध राहणार नसल्याचे समन्वयकांनी ठणकावले.  सरकार मराठा समाजाचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी जे करता येईल ते करीत आहे. मराठा बहुल भागांना टारगेट केले जात आहे. महिलांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे आरोप त्यांनी केले.

आरक्षणाचा लढा  मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत या बैठकीत विविध नऊ ठराव घेण्यात आले. यानुसार १ ऑगस्ट रोजी राज्यतील प्रत्येक मराठा आमदार, खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणे, आरक्षण मिळेपर्यंत सरकारशी असहार आंदोलनकरणे,  मराठा क्रांती आंदोलनातील शहीदांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, म्हणून ५० लाख रुपये देण्यात यावेत. त्यांच्या परिवारातील सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. शहीद काकासाहेब शिंदे, रोहन तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची एस.आय.टी मार्फत चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे बिनर्शत तात्काळ मागे घेण्यात यावेत.  मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. असे विविध ठराव करण्यात आले.