Thu, May 23, 2019 04:54होमपेज › Marathwada › नवरदेवाचे बूट लपविल्याने झालेले लग्न मोडले

नवरदेवाचे बूट लपविल्याने झालेले लग्न मोडले

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:56PMकेज : दीपक नाईकवाडे

तालुक्यातील कुंबेफळ येथे रविवारी दुपारी तुळजापूर येथील मुस्लिम समाजाच्या युवकाचा विवाह पार पडल्यानंतर नवरदेवाचे बूट लहान मुलांनी लपविल्याच्या कारणावरून नवर्‍या मुलाने सासरच्या मंडळींना मारहाण केल्याने झालेले लग्न वधू पित्याने मोडल्याने नव वधुला न घेताच वर्‍हाडास परत जावे लागले

तालुक्यातील कुंबेफळ येथील मुस्लिम समाजाच्या मुलीचा विवाह तुळजापूर येथील मुस्लिम समाजाच्या युवका सोबत रविवारी लागल्या नंतर लहान मुलांनी लग्नातील रितीरिवाजा मुळे लहान मुलांनी नवरदेवाचा बूट लपवून ठेवला  नवरदेवास आपला बूट लपविल्याचा राग आल्याने नवरदेवाने हा राग झालेल्या सासरा व मेहुण्यावर काढत त्यांना मारहाण केली नवरदेवाने वधुपित्यास मारहाण केल्या नंतर वधू मंडळी व वर मंडळीच्या दोन्ही गटात मारहाण झाल्याने नवरदेवासह इतर चारजण जखमी झाले सदर घटने नंतर वधू पित्याने झालेले लग्न मोडल्याने नवरदेवास नवरी न घेताच माघारी रिकाम्या हाताने परत जावे लागले.

नवरदेवाने पोलिस ठाण्यात घेतली धाव

नवरदेवाने बूट लपविण्याच्या कारणांमुळे केलेल्या मारहाणी मुळे लग्न मंडपात दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत दोन्ही गटात वाद चालु होता तर नवरदेवाने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती अशी माहिती कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी दिली या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

अनेकदा घडतात वाद

नवरदेवाचे बूट लपवून त्या बदल्यात पैसे मागण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. हिंदी सिनेमा, मालिकांमधून यावर भर दिला जात असल्याचे अनेकदा दिसते. त्यामुळे लग्न सोहळ्यातील हा एक अविभाज्य भागच बनल्याचे दिसते. यातून अनेकदा अवास्तव पैशाची मागणी झाल्यामुळे, नवरदेवाचा ‘इगो’ हर्ट झाल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात.