Sat, Mar 23, 2019 02:08होमपेज › Marathwada › मराठवाडा : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

मराठवाडा : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Feb 21 2018 4:43PM | Last Updated: Feb 22 2018 10:31PMलोहा : प्रतिनिधी

सततच्या नापिकीतून कर्जबाजारी झालेल्या तरुण शेतकऱ्याने विष पिउन आत्महत्या केल्याची घटना जुना लोहा येथे उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुना लोहा येथील रमेश माधवराव शेटे (वय 42) माजी नगरसेवक यांच्या कुटुंबात दोन एकर जमीन होती. गत पंधरा वर्षानंतर राजकारण सोडून त्यांनी शेतीमधे लक्ष दिले होते. परंतू गत तीन चार वर्षापासून शेतातीत नापिकी होत गेली. शेतीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर वाढतच गेले. गत अनेक दिवसांपासून रमेश शेटे हे विवंचनेत होते. 20 फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे शेतात झोपन्यासाठी जातो म्हणून रात्री घरातून शेतामध्ये गेले. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजले तरी ते घरी आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता ते शेतातील आखाडयावर मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती लोहा पोलिसांना देऊन त्‍यांचे शव उच्चस्तरीय तपासणीसाठी लोहा ग्रामीण रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पच्छात  एक मुलगा,एक मुलगी,पत्नी वडील असा परिवार आहे. त्यांना बैंकेचे व खाजगी कर्ज होते. अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

दुःखाचे हुंदके देत मुलीने दिली बारावीची परीक्षा 

आज पासून बारावी परीक्षेस प्रारंभ झाला असून, कर्ज बाजारी होउन आत्महत्या केलेल्या रमेश शेटे यांच्या मुलीचा बारावीचा पेपर होता. म्हणून मुलगी काल परभनी येथे परीक्षा देण्यासाठी गेली होती. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलीने ऊठून परीक्षेला जाण्यासाठी पुर्ण तयारी करूण निघाली असता अच्यानक वडिलांनी आत्महत्या केल्याची बातमी कळताच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आपली छत्र छाया गेली. आता आपले काय होणार असे म्हणत हुंदके देत डोळ्यात अश्रू आणून भविष्य ऊजळण्यासाठी दुःख पचऊन मयत रमेश शेटे यांच्या मुलीने आज परीक्षा दिली.