Sun, Jul 21, 2019 08:05होमपेज › Marathwada › कळमनुरी : कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्‍महत्‍या 

कळमनुरी : कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्‍महत्‍या 

Published On: Jun 20 2018 4:20PM | Last Updated: Jun 20 2018 4:20PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी 

सततच्या नापिकीसह बँकेच्या कर्जाला कंटाळून ब्याऐंशी वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील गोर्लेगाव येथे बुधवारी (दि.20) रोजी सकाळी घडली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गोरलेगाव येथील मयत शेतकरी धोंडबाराव भवानराव पतंगे वय 82 वर्ष हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. सततची नापिकी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी शाखा पोत्रा येथील शेतीसाठी 40 हजार रूपयांचे कर्ज तसेच अन्य एका जनाचे कर्ज होते. सदर घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बुधवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शेतात विषारी औषध पिवून त्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी प्रवीण पतंगे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेरले हे करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत काशीद, पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, पीएसआय तानाजी चेरले, नागनाथ दीपक, सूर्य आदी कर्मचार्‍यांनी भेट दिली.

शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांनाकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्यावर उशिरा मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.