Wed, May 22, 2019 06:55होमपेज › Marathwada › आष्टी तालुक्यातील कासारी येथे एकाचा खून

आष्टी तालुक्यातील कासारी येथे एकाचा खून

Published On: May 09 2018 5:27PM | Last Updated: May 09 2018 5:27PMआष्‍टी : प्रतिनिधी 

आष्टी तालुक्यातील कासारी येथील शेतकरी शिवाजी पोपट गिरी (वय 40) यांचा भरदिवसा पावनेएकच्या सुमारास खुन करण्यात आला. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली आहे.

शिवाजी पोपट गिरी हे आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात बसलेले होते. संशयीत आरोपी गणेश लक्ष्मण पुरी (वय 34) व त्याची पत्नी तेथे आले. प्रथमतः त्यांची शिवाजी गिरी यांच्यासोबत बोलाणे झाले. बोलणे सुरू असतानाच अचानक गणेश पुरी याने आपल्याकडील गुप्तीने शिवाजी गिरी याच्यावर जोरात वार केले. सदर घटना घडत असताना सदर ठिकाणी असणाऱ्या गणेशच्या पत्नीने व शिवाजी गिरी यांचा कामगार आश्पाक पागर याने गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला, माञ त्याने दोघांना झिडकारत शिवाजीवर वार केले. आणि यातच शिवाजीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर गणेश पुरी व त्यांच्या पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्‍थितीचा आढावा घेतला. यानंतर पो.नि.सय्यद शौकत अली व त्यांची टिमने  घटनेचा पंचनामा करून पुढील तपास  सुरू केला आहे. शिवाजी गिरी यांना शवविच्छेदनासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.