Tue, May 21, 2019 00:20होमपेज › Marathwada › स्‍वाभिमानीचा औरंगाबाद - सोलापूर मार्गावर चक्‍काजाम 

स्‍वाभिमानीचा औरंगाबाद - सोलापूर मार्गावर चक्‍काजाम 

Published On: Jul 19 2018 5:09PM | Last Updated: Jul 19 2018 5:09PMवडीगोद्री : प्रतिनिधी 

वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन केले. या चक्का जाम आंदोलनात बैलगाडीसह दुभती जनावरे आंदोलन स्थळी बांधण्यात आली होती. दूध दरासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे दि १९ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र २११ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटना यांनी पाठींबा दिला आहे.

सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांबद्दलची अनास्था व शहरी भागातील मतदारांच्या हितासाठी जाणून बुजून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर ५ रु अनुदान सरकारने थेट बँक खात्यावर द्यावे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा शांतता पूर्ण मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सरकारला देण्यात आला आहे. एक तास चक्का जाम केल्यानंतर मंडळ अधिकारी तांबोळी यांना निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले.