Sun, May 26, 2019 21:00होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : पेटवून घेऊन तरुणाची आत्महत्या 

मराठा आरक्षण : पेटवून घेऊन तरुणाची आत्महत्या 

Published On: Aug 05 2018 2:23PM | Last Updated: Aug 05 2018 2:25PMपरभणी : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथे घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनंत लेवडे असे नाव असलेल्या तरुणाने मृत्यूपूर्वी त्याने फेसबूकवर आरक्षणाबद्दलची पोस्टही टाकली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सेलू तालुक्यातील अनंत सुंदरराव लेवडे या तरुणाने फेसबुकवर आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारी पोस्ट टाकली होती. तसेच त्यात स्वत:चे बलिदान देत असून मला आनंद होत असल्याचे म्हटले होते. पोस्ट टाकल्यानंतर काहीच वेळात त्याने स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

Image may contain: text