Tue, Nov 13, 2018 23:33होमपेज › Marathwada › आरक्षणाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी : राणे

आरक्षणाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी : राणे

Published On: Feb 11 2018 1:03AM | Last Updated: Feb 11 2018 12:56AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा व मुस्लिम आरक्षणाबाबत शासनाने आतापर्यंत काहीच निर्णय न घेतल्याने मराठा व मुस्लिम बांधव संतप्त असून शासनाने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे मत आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. 

ते दोन दिवसांपासून शहरात आहेत. रविवारी (दि. 11) नारायण राणे यांची औरंगाबादेत सभा आहे. याची तयारी करण्यासाठी व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बांधणी करण्यासाठी ते येथे तळ ठोकून आहे. या दरम्यान त्यांनी अनेक पक्षांतील माजी आमदार, नगरसेवक, सामाजिक संघटनांतील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक जण नारायण राणे यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असून आज होणार्‍या सभेत सोबत येणार्‍यांची नावे घोषित करण्यात येणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले की, शेतकरी वर्ग हा मराठा समाजातील जास्त आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. त्यांना जर आरक्षण जाहीर केले तर त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरी मिळाली तर येणार्‍या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. सरकारने मराठा आरक्षण देण्याचे मान्य केले; परंंतु आता ते प्रकरण न्यायालयात असल्याचे कारण पुढे करत निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.