Thu, Nov 15, 2018 03:26होमपेज › Marathwada › 'मी मेल्यावर तरी मराठा समाजाला आरक्षण द्या' 

'मी मेल्यावर तरी मराठा समाजाला आरक्षण द्या' 

Published On: Sep 02 2018 6:36PM | Last Updated: Sep 02 2018 6:36PMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील इरगाव येथील एका ३५ वर्षीय तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने राहत्या घरी विषारी द्रव्‍य  प्राशन करुन आत्महत्या केली. यानंतर या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठेऊन ठिय्या मांडला. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. यामुळे मी हे जग सोडून जात आहे. मी मेल्यावर तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट लिहिले आहे.

आप्पासाहेब सुंदरराव काटे (वय ३५, रा. इरगाव ता. गेवराई जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आप्पासाहेब यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी विषारी द्रव्‍य पिऊन आत्‍महत्‍या केली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आप्पासाहेब काटे त्‍यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.