Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Marathwada › लातुरात मराठा क्रांतीने केले मराठा आमदारांच्या पुतळ्याचे दहन

लातुरात मराठा क्रांतीने केले मराठा आमदारांच्या पुतळ्याचे दहन

Published On: Jul 26 2018 9:06PM | Last Updated: Jul 26 2018 9:06PMप्रतिनिधी: लातूर

मराठा समाजातील निष्क्रीय आमदारांच्या प्रतिकात्मक  पुतळ्याचे लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी सायंकाळी मराठा क्रांती भवनासमोर दहन करण्यात आले. यावेळी मराठा आमदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांच्या पुतळ्यास आंदोलकांनी जोडे मारले.

मराठा समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. त्याच्यासाठी रोजचा दिवस अडचणी घेऊन जागत आहे. पैशाअभावी अनेक मुलां-मुलींचे शिक्षण अडचणीत आले आहे. 

आर्थिक दैन्याला कंठाळून मरणाला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांत मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.  या परिस्थितून समाजाला बाहेर काढण्यासाठी आरक्षण हा सक्षम व समर्थ पर्याय आहे. तथापि ते मिळावे म्हणून मराठा समाजाच्या आमदारांनी आवाज उठवला नाही. सरकारने जाहीर केलेल्या सवलती मराठा समाजाला मिळाल्या नाहीत म्हणूनही कोणी आंदोलन केले नाही. अशा
स्वकीयांनीच समाजाचे वोटोळे केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. समाजासाठी उपयोगी नसणाऱ्या अशा लोकप्रतिनिधिंना समाज त्यांची जागा दाखवेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात मोठ्या ,संख्येत समाजबांधव सहभागी झाले होते.