Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Marathwada › परळी-धर्मापुरी मराठा क्रांती मोर्चा: दगडफेक; एसटी बस फोडली

परळी-धर्मापुरी मराठा क्रांती मोर्चा: दगडफेक; एसटी बस फोडली

Published On: Jul 20 2018 12:58PM | Last Updated: Jul 20 2018 12:24PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

मराठा समाजाला नाोकर्‍यामध्ये आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना हम्मीभावाची शाश्वती द्यावी, ७२ हजार महानोकर भरतीत १६ टक्‍के आरक्षण देऊन न्याय द्या. या व इतर मागण्यांसाठी दि. १८ जुलैपासुन मराठा क्रांती ठोक मोर्चा माध्यमातून हजारोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. याला हिंसक वळण लागले आहे. काल सायंकाळी एका बसवर दगडफेक झाली होती, त्यानंतर आज दि. २० रोजी सकाळी परळी-धर्मापुरी रस्त्यावर दगडफेक करून एसटी बस फोडली आहे. 

परळीच्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात हिंसक पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच आज सकाळी धर्मापुरीला जाणारी सकाळची पहिली बस आपल्या ठरल्या वेळेत बसस्थानाकातून निघाली. परळी–धर्मापुरी गाडी परळी–धर्मापुरी रोडवरील कासारवाडी फाट्यावर सकाळी साडे सात वाजता धर्मापुरीच्या दिशेने जात असताना काही अज्ञात कार्यकर्तांनी बसच्या दिशेने दगडफेक करुन बसची तोडफोड केली. अधिक तपासासाठी परळी ग्रामीण पोलिस घटना स्थळावर दाखल झाली असुन पुढील तपास करित आहेत.