Fri, Nov 16, 2018 15:02होमपेज › Marathwada › मराठा मोर्चा : हिंगोलीत तीन बसवर दगडफेक

मराठा मोर्चा : हिंगोलीत तीन बसवर दगडफेक

Published On: Jul 21 2018 1:50PM | Last Updated: Jul 21 2018 2:43PMहिंगोली : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी धरणे आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनास शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करून परभणी-हिंगोली मार्गावर टायर जाळून तीन बसेसवर दगडफेक केली. जवळा बाजार कडकडीत बंद करण्यात आले. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित समाज बांधवानी विद्यमान सरकार व टिकेची झोड उठवीली तर दुसरीकडे जवळा बाजार येथे सुरू असलेल्या चक्कजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी तीन बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या महामार्गावर आलेल्या बस (क्र. एमएच ४० वाय ५४३२, एमएच. ०७ सी. ७४५९, एमएच. २० बीसी २६९६) या बसगाडीवर दगडफेक करण्यात आली. परभणी-हिंगोली महामार्गावर आंदोलनकर्ते ठाण मांडून बसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.