Mon, Nov 19, 2018 23:09होमपेज › Marathwada › मराठा क्रांती मोर्चाला परळीत सुरुवात

मराठा क्रांती मोर्चाला परळीत सुरुवात

Published On: Jul 18 2018 2:20PM | Last Updated: Jul 18 2018 2:20PMपरळी वैजनाथ (जि. बीड) : प्रतिनिधी

मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा तहसीलच्या दिशेने कूच करणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव परळीत दाखल झाले आहेत.

राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असून, आरक्षणाच्या मागणीसह, सरकारने जाहीर केलेली नोकरभरती रद्द करावी अशी तीव्र मागणी होत आहे.