Wed, Nov 14, 2018 17:34होमपेज › Marathwada › मुख्यमंत्री आंदोलकांबरोबर चर्चा करणार; चर्चेला लातूरमधून विरोध 

मुख्यमंत्री आंदोलकांबरोबर चर्चा करणार; चर्चेला लातूरमधून विरोध 

Published On: Jul 29 2018 1:36PM | Last Updated: Jul 29 2018 1:37PMलातूर : प्रतिनिधी 

गेल्या दोन आठवड्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्य पेटले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात या मागणी ठिय्या आंदोनले सुरु आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेले मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठीच सरकारने काल विधान सभेत सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी विधान सभेचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आज दुपरी ही चर्चा होणार आहे असे सांगण्यात आले आहे. 

चर्चेला कोणी जावू नये : लातूर सकल मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

आंदोलकांच्यावतीने कोणीही मुख्यमंत्र्यांशी कोणी ही चर्चेला जावू नये असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. कारण मुख्यमंत्री यांना मराठा समाजाचे सगळे प्रश्न माहित आहेत. त्यांनी त्यावर ठोस निर्णय घ्यावेत. उगाच आंदोलकांना चर्चेला बोलवून आंदोलकांमधे फूट पाडू नये. मुख्यमंत्री यांच्याशी कोण चर्चेला जात असेल तर ते सरकारचे चेले, दलाल असतील. त्यांचा आणि मराठा मोर्चाचा काहीही संबंध असणार नाही. त्यांना समाजाच्या वतीने गद्दार समजून चांगलाच धडा शिकवला जाईल. याची नोंद घ्यावी. अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. 

याचबरोबर लातूर सकल मराठा क्रांती कोर्चाच्या समन्वयकांनी, सरकार मराठा समाजाचे आंदोलन मोडण्यासाठी जे करता येईल ते करीत आहे.  मराठा बहुल भागांना टारगेट केले जात आहे .महिलांवरही गुन्हे दाखल होत आहेत. संयमाचा बांध फुटून उद्रेक होईल. असा सरकारला इशारा दिला.