Wed, Jun 26, 2019 23:29होमपेज › Marathwada › परळीतील मराठा मोर्चाचा चौथा दिवस उजाडला

परळीतील मराठा मोर्चाचा चौथा दिवस उजाडला

Published On: Jul 21 2018 10:13AM | Last Updated: Jul 21 2018 10:13AMपरळी वैजनाथ :प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करुनच राज्यातील मेगा नोकरभरती करावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात गेले चार दिवस बुधवार दि. १८ पासून ठिय्या धरला आहे. याच मोकळ्या मैदानात मराठा मोर्चाचा चौथा दिवस उजाडला.तरीही आंदोलनाची तीच धग तोच निर्धार कायम आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दि. १८ रोजी ठोक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आंदोलनाने नाट्यमय वळण घेत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन विसर्जित करायचे नाही ही भूमिका घेण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसर सोडलेला नाही. मोर्चेकरी परळीच्या तहसील समोरून मोर्चा हलवायला तयार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून ठोस निर्णायक लेखी आश्वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही या घेतलेल्या भूमिकेवर आंदोलनकर्ते आजही ठाम आहेत. त्यामुळे पेच अद्यापही कायम आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतल्याने स्थानिक प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. परळीत बुधवारी सुरु झालेले आंदोलन आज दि. २१ रोजी चौथ्या दिवशीही सुरुच आहे. परळीच्या आंदोलनात दररोज  विविध ठिकाणच्या समाजबांधवांचा सहभाग वाढत आहे. तर, या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटू लागले आहेत.