Wed, Dec 19, 2018 21:01होमपेज › Marathwada › सलग तिसऱ्या दिवशी मराठा समाजाचे आंदोलन

सलग तिसऱ्या दिवशी मराठा समाजाचे आंदोलन

Published On: Jul 20 2018 2:06PM | Last Updated: Jul 20 2018 2:06PMपरळी : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या संदर्भात काढण्यात आलेल्या ठोक मोर्च्याचे रूपातंर ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले होते. आज तिसरा दिवस उजाडला तरी आंदोलन सुरूच असुन लेखी ठोस आश्वासनाशिवाय माघार नाही, या मुद्द्यावर आंदोलक ठाम आहेत. याला जिल्ह्यातून पाठिंबा दिला जात आहे.

परळीतील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरात रास्तारोको, ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मेगा नोकर भरतीत मराठा तरूणांना १६ टक्के आरक्षण ठेवणार व कोर्टाचा निर्णय मराठा समाजाच्या बाजुने लागल्यास बँकलाग भरू असे दोन्ही सभाग्रहात सांगीतले असले तरी आंदोलकांनी यावर विश्वास न ठेवता आंदोलन सुरूच ठेवले आहे. परळी तहसिल समोर ठिय्या आंदोलन चालुच असुन आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.