Tue, Mar 26, 2019 19:56होमपेज › Marathwada › हिंगोली : मराठा आंदोलक आक्रमक; आमदारांना धक्काबुक्की

हिंगोली : आंदोलक संतप्त; आमदारांना धक्काबुक्की

Published On: Jul 27 2018 2:22PM | Last Updated: Jul 27 2018 2:25PMहिंगोली : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी रास्तारोको आंदोलनादरम्यान आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेल्या विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांना संतप्‍त जमावाने धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार घडला. जमाव भडकल्यामुळे अखेर आमदार वडकुते यांनी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला. तर दुसरीकडे दातीपाटीवर संतप्‍त जमावाने ट्रक पेटवून दिला. तसेच साळवा पाटीवरही बाभळीचे झाड हिंगोली-नांदेड महामार्गावर आडवे पाडून महामार्ग बंद पाडला.

आखाडा बाळापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने दुपारी १२ च्या सुमारास रास्तारोको आंदोलन सुरू झाले. या आंदोलनास विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी हजेरी लावून माईक ताब्यात घेतला. त्यानंतर आंदोलकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्‍त झालेल्या जमावाने माईक हिसकावून घेत त्यांना धक्‍काबुक्‍की केली. हा प्रकार वाढत गेल्याने आमदार वडकुते यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत थेट बाबुराव वानखेडे यांचे निवासस्थान गाठले. 

संतप्‍त जमावाने आखाडा बाळापुरातील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाची ताडफोड केली. कळमनुरी तालुक्यातील दाती फाट्यावर अज्ञात आंदोलकांनी उभा ट्रक पेटवून देण्यात आला.