Thu, Apr 25, 2019 15:51होमपेज › Marathwada › परळीत शालेय साहित्याच्या दुकानाला भीषण आग

परळीत शालेय साहित्याच्या दुकानाला भीषण आग

Published On: May 03 2018 1:42PM | Last Updated: May 03 2018 1:42PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

शहरातील अरुणोदय मार्केट मधील शिवम इंटरप्राईज या दुकानाला गुरूवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे शालेय साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठे प्रयत्न केले.

अरुणोदय मार्केट मध्ये शिवम इंटरप्राईजेस हे शालेय साहित्‍याची विक्री करणारे दुकान आहे. या दुकानाला आज सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. अग्‍निशमक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्‍न करून ही आग आटोक्‍यात आणली. मात्र, दुकानातील शालेय साहित्‍या जळाल्‍याने दुकानदाराचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. 

दरम्‍यान, ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. दुकान बंद असल्याने सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

Tags :  beed parli, fire, school stationary shop