Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Marathwada › गाळात फसून सात वर्षीय बालकाचा मृत्यू  

गाळात फसून सात वर्षीय बालकाचा मृत्यू  

Published On: May 01 2018 7:18PM | Last Updated: May 01 2018 7:18PMमाजलगाव : प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा वाढल्‍याने नदीत आंघोळीसाठी गेलेल्‍या सात वर्षीय बंटी नावाच्या मुलाचा गाळात फसून दुर्देवी मृत्‍यू झाला. ही घटना आज १ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली

याबाबत सविस्तर माहिती अशी, की बंटी युवराज पवार हा ७ वर्षीय मुलगा आपल्या काही मित्रांसह दुपारी सिंधफना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला त्याठिकाणी रस्त्याच्या कामामुळे नदी पात्रात अनेक मोठे खड्डे करण्यात आले आहेत. त्याठिकाणी नदीतील गाळ आणि पाणी असल्याने बंटी व त्याच्या मित्रास पाण्याचा आणि गाळाचा अंदाज येऊ शकला नाही गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत, त्यामुळे शरीराची होत असलेली लाही रोखण्यासाठी पाण्यात जाऊन दिलासा मिळावा यासाठी अनेक मुले,नागरिक दुपारच्या वेळी नदीपात्रात अंघोळीसाठी येत असतात.  त्‍यामुळे ही  मुलेही अंघोळीसाठी नदी पात्रात गेली होती. यावेळी पाण्यात पोहण्यात दंग असताना, तेथील खड्ड्यात असलेल्या गाळाचा अंदाज ७ वर्षीय बंटीस न आल्याने तो गाळात फसला व पाण्यात बुडाला सोबतच्या मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर काही नागरिकांनी त्यास बाहेर काढले असता, तो मृत अवस्थेत दिसून आला.शहरातील जुन्या बसस्थानाकासमोरील असलेल्या सौदागर रुग्णालयाच्या मागे तो राहत होता. या घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.