Thu, Jul 18, 2019 00:29होमपेज › Marathwada › केज तालुक्यात नऊ कोटींची थकबाकी

केज तालुक्यात नऊ कोटींची थकबाकी

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:42AMकेज : प्रतिनिधी
तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या सहा उपविभागातील 17 हजार 222 विद्युत ग्राहकांकडे फेब्रुवारी अखेर पर्यंत 8 कोटी 65 लाख 20 हजार 348 रुपयांची थकबाकी थकली आहे. या पैकी सात हजार पाचशे एकतीस विद्युत थकबाकीदार ग्राहकाकडुन एक कोटी बत्तीस लाख रुपयांची वसुली करण्यात आली आली आहे. तर दहा हजार ग्राहकांकडील सात कोटी रुपयांची थकबाकीची वसुली करण्यात येत आहे. 
केज शहरासह तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या सहा उपविभागात विद्युत वितरण कंपनीचे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक,  पाणीपुरवठा योजनासह एकूण सतरा हजार दोनशे बावीस विद्युत ग्राहक आहेत. या विद्युत ग्राहकाकडे फेब्रुवारी अखेर पर्यंत वीज देयकाचे आठ कोटी पासष्ट लाख वीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांची थकबाकी थकली होती. या थकबाकीची वसुलीसाठी विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता सादेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा उपविभागात वसुली पथक तयार करण्यात येऊन मार्च महिन्यात थकबाकीची वसुली करण्यास सुरुवात करण्यात आली सहा उपविभागातील सात हजार पाचशे एकतीस विद्युत ग्राहकाकडून एक कोटी बत्तीस लाख रुपयांची वसुली 19 मार्च पर्यंत करण्यात आली आहे.