Tue, Aug 20, 2019 05:04होमपेज › Marathwada › संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफीची अंमलबजावणी : मुंडे

तेलंगणाप्रमाणे शेतकर्‍यांना मोफत वीज द्यावी : मुंडे

Published On: Jan 08 2018 2:57PM | Last Updated: Jan 08 2018 2:57PM

बुकमार्क करा
नांदेड : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफीही देता येते आणि मोफत वीजही देता येते. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणा-या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड येथे आले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शेतकऱ्यांना वाढीव दिलेली विजेची बिले मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली .

कापसावरील बोन्ड अळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाहीर केलेली मदत फसवी आहे. बियाणे कंपन्या मदत देण्यास तयार नाहीत. त्या मोन्सेटो कंपनीकडे बोट दाखवत आहेत, ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल मग शेतक-यांना मदत केंव्हा मिळणार? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यात लोहा, उमरी व माहूर अशा 3 ठिकाणी सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.