Tue, Jun 02, 2020 19:15होमपेज › Marathwada › आजपासून महानुभाव संत संमेलन

आजपासून महानुभाव संत संमेलन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी :  प्रतिनिधी

तालुक्यातील असोला येथील श्री  कृष्णधाम परिसरात  31 मार्च व  1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलननाचे आयोजन करण्यात आले असून या दोन दिवसीय संत संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन असोला येथील महंत  दुधगावकरबाबा शास्त्री यांनी केले आहे.

परभणी-वसमत मार्गावरील असोला पाटी येथील श्री  कृष्णधाम मंदिर परिसरात  31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या संत संमेलनास  देशभरातील अनेक संताची उपस्थिती राहणार आहे. या संत संमेलनास 31 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 या दरम्यान  परभणी शहरातील नवा मोंढा भागात प्रवचन सभा होईल. महिला माता भगिनींच्या वतीने महापूजा होणार असून, कृष्ण मूर्तीची सव्वालाख फुलांनी महिलांच्या हस्ते  महापूजा होणार असून महाआरती पूजा महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते होणार आहे. तीन ते चार तर चार ते सात भव्य शोभायात्रा नवा मोंढा परभणी येथून ते संत तुकाराम महाविद्यालय या ठिकाणी होईल. या ठिकाणी महापूजा आरतीचे आयोजन होणार आहे. तर खा. संजय जाधव, आ.राहुल पाटील, आ.विजय भाबळे, आ. मधुसूदन केन्द्रे, आ. मोहन फड, आ. रामराव वडकुते, आ. बाबाजानी दुर्राणी, मेघनाताई बोर्डीकर , अभय चाटे ,आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, रत्नाकर गुठे, रवीराज देशमुख यांच्या हस्ते शस्त्रदीप महाआरतीने शोभायात्रेचे विसर्जन करण्यात येईल. याचवेळी प्रार्थना ह.भ.प अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या मधुरवाणीने होईल. 

    या अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे , पशुसंवर्धनमंत्री महादेवराव जानकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्सविकासमंत्री अर्जुनराव खोतकर, खा.राजीव सातव, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.हेमंत पाटील, आ.तानाजी मुककुळे, जयप्रकाश मुंदडा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. विविध राज्यातून येणार्‍या हजारो साधू-संत, भाविक भक्त यांच्या भेटीचा योग परभणीकरांना लाभणार आहे. भाविकांनी असोला येथील श्री कृष्णधाम मंदिर परिसरात होणार्‍या दीक्षाविधी, श्रीपंचावतार उपहार, भव्य शोभायात्रा आणि अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास उपस्थित राहून संतवचन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे  आवाहन  केले आहे.


  •