Mon, Jan 21, 2019 01:05होमपेज › Marathwada › नुकसान लाखात, मदत मिळते हजारात  

नुकसान लाखात, मदत मिळते हजारात  

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:36AM गेवराई : प्रतिनिधी

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा घटना गतवर्षीही झाल्या आहेत. नुकसान लाखांत असले तरी शेतकर्‍यांना केवळ पाच ते दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात असल्याने शेतकर्‍यांवरील संकट जैसे थे राहते  गेवराई तालुक्यात 29 गावामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिट होऊन हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखात नुकसान झाले. पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याची मागणी झाली. 

याची दखल घेत शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले. नुकसान लाखात झालेले असताना शासनाकडून मदत मात्र पाच-दहा हजारात मिळते   

ऑलाईनच्या फेर्‍यात विमा 
शेतीत शेतमाल पिकविताना त्यासाठी शेतकर्‍यांना विमा कवच दिले जाते. अस्मानी संकटाने झालेल्या नुकसानीनंतर शेतकर्‍यांना विमा रक्कम दिली जाते. मात्र  यासाठी किचकट अटी व त्यातच ऑनलाईन पध्दतीने विमा स्विकारला जात असल्याने यापासून बहुतांश शेतकरी वंचित राहतात. त्यातच बँकांकडून विमा भरण्याच्या मुदतीअखेर चार-पाच दिवस विमा स्विकारला जातो. त्यामुळे बँकेत होणारी प्रचंड गर्दी व आँनलाईन प्रणाली यामुळे अनेक शेतकरी यापासून दोन हात लांबच राहत आहेत.  

अस्मानी संकटानंतर नुकसान होऊनही त्यांना मदत मिळत नाही. तसे शेतकरी  या आँनलाईन प्रणालीचा सामना करु शकेल का? हे शासनाने पाहणे देखील गरजेचे झाले आहे. 
मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. 
दरवर्षी सावरण्याची आशा असते. परंतू कधी दुष्काळ तर कधी गारपीठ यामुळे पिकांचे नुकसान कायम आहे.