Wed, Aug 21, 2019 16:51होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे; चंद्रकांत पाटलांचे तुळजाभवानीला साकडे

मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे; चंद्रकांत पाटलांचे तुळजाभवानीला साकडे

Published On: Jul 18 2019 8:24PM | Last Updated: Jul 18 2019 8:21PM
तुळजापूर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू दे, राज्यात भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानी देवीला घातले. कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आज (दि. १८) तुळजापुरात आले होते. तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दोन्ही काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपध्ये प्रवेश केला. 

फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण आणि त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी मराठवाडा अध्यक्ष जीवन राजे इंगळे, जिल्हा अध्यक्ष महेश गवळी, अण्णासाहेब शिरसागर, कुमार ढोले, प्रशांत इंगळे, प्रशांत अपराध, मयूर कदम, किशोर पवार, सतीश खोपडे, अर्जुन आप्पा साळुंखे, संदीप गंगणे, धैर्यशील कापसे, औदुंबर जमदाडे आदी उपस्थित होते.