Sun, Apr 21, 2019 04:29होमपेज › Marathwada › बिबट्याने केला हल्ला; शेतकरी जखमी

बिबट्याने केला हल्ला; शेतकरी जखमी

Published On: Jun 18 2018 3:53PM | Last Updated: Jun 18 2018 3:52PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळच्या भोजनकवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या बिबट्याने रविवारी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. गावाजवळील माळरानातून तो डोंगरदरीत गेल्याची शक्यता असून वनविभागाच्या वतीने याची शहानिशा करण्यात आली आहे. दरम्यान नागरीकांनी घाबरू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. 

भोजनकवाडी गावाच्या आसपास डोंगर जमीन आहे. तसेच परिसरात दौंडवाडी शिवारातील गावातील अंकुश वसंत केदार (रा. भोजनकवाडी, वय 23) हा युवक शेतातील मिरचीला पाणी देत होता. यादरम्यान वीज खंडित झाली. पाणी पिण्यासाठी म्हणून तो विहीरीवर गेला. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अंकुश जखमी झाला आहे. त्याच्यावर धर्मापुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.            

नागरिकांनी घाबरू नये 

दरम्यान, बिबट्या हानी करणारा प्राणी नाही. तसेच तो एका ठिकाणी कायम राहत नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बी. जी. कस्तुरे (वनपाल, वनपरिक्षेत्र परळी वैजनाथ) यांनी केले आहे.