Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Marathwada › लिंबू सरबतही ठरू शकते आरोग्यास घातक

लिंबू सरबतही ठरू शकते आरोग्यास घातक

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 1:12AMपूर्णा : प्रतिनिधी

मुनवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे. तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यासाठी नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. 

उन्हाचा पारा 43 अंशापर्यंत पोहचलाय. तळपत्या उन्हात थंड पाणी आणि शीतपेयांचे आकर्षण मनात उत्पन्न होते. लिंबू शरबत, कोल्ड्रिंक्स आणि इतर शीतपेयांच्या हातगाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोन ग्लास शीतपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे लिंबू शरबत नागरिकांना खास आकर्षित करते, परंतु हे शरबत पीत असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केल्याने ते पिल्यामुळे टायफाईड व अतिसारसारखे आजार होऊ शकतात.

लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केला असेल तर अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शीतपेय लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते .त्यामुळे अन्नपचनास मदत होते .तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.त्यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते कोल्ड्रिंक्सपासून शरीरावर होणार्‍या विपरीत परिणांमावर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी आपला मोर्चा लिंबू शरबताच्या हातगाड्यांकडे वळवला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळवण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात.यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते.

Tags : lemon syrup may be dangerous to health