Sun, Jul 21, 2019 10:21होमपेज › Marathwada › लातूर : ऊसाचा उखळता रस अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

लातूर : ऊसाचा उखळता रस अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

Published On: Feb 02 2018 3:59PM | Last Updated: Feb 02 2018 3:59PMलातूर : प्रतिनिधी

अंगावर ऊसाचा उखळता रस पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तोंडार येथील साखर कारखान्यातील एका कामगाराचा उपचारादम्यान शुक्रवारी सकाळी लातूर येथे मृत्यू झाला. पंडीत मरीबा वाघमारे असे त्यांचे नाव आहे. उदगीर तालुक्यातील तोंडार येथे असलेल्या विकास युनिट २ या साखर कारखान्यात पंडीत कामगार म्हणून कार्यरत होते. २० जानेवारी रोजी ते व अन्य एक कामगार कारखान्यात काम करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर ऊसाचा उखळता रस पडल्याने ते भाजले गेले. त्यानंतर त्यांना उदगीर येथील एका खासगी दवाखान्यात व तेथून लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शुक्रवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली यावेळी उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. दरम्यान मयत पंडीत यांच्या परिवाराची आर्थिक परस्थिती बिकट असून त्यांच्या दोन मुलांना कारखान्यात नोकरी द्यावी तसेच उपचाराचा खर्च व अन्य आर्थिक मदत द्यावी, तरच आम्ही पार्थिव ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.