Sun, Mar 24, 2019 23:36
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › पाहणारे हताश! तो डोळ्यादेखत गेला वाहून (Video)

पाहणारे हताश! तो डोळ्यादेखत गेला वाहून (Video)

Published On: Jun 09 2018 8:19PM | Last Updated: Jun 09 2018 8:36PMलातूर : प्रतिनिधी

लातूरमध्ये शिरुर अनंतपाळ तालुक्यात शरघनी नदीला आलेल्या पुरात एकजण वाहून गेला. पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने ३२ वर्षीय जयप्रकाश जवळकोटे या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना डोळ्यादेखत घडत असतानाही तिथे असलेल्या लोकांना कोणतीच मदत करता आली नाही.

लातूर जिल्ह्यतील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवादी पुलावर आज शनिवारी सायंकाळी  ही घटना घडली. प्रकाश जवळकोटे (वय 32) या मजुराला शिरूर अनंतपाळहुन नागेवाडी कडे जायचे होते. शघरणी नदीला पूर आल्याने त्याचे पाणी पुलावरून वाहत असतानाही, नदीच्या पाण्याचा अंदाज न घेता प्रकाशने पूल ओलांडण्याचा प्रयत्न सुरू केला. तो प्रवाहाच्या मध्यभागी आला असता, त्याचा तोल गेला व तो प्रवाहात वाहून गेला.

वाहून गेलेल्या प्रकाश एका झाडात अडकला. मात्र, तेथून त्याला बाहेर पडता न आल्याने गुदमरुन मृत्यू झाला.