होमपेज › Marathwada › लातूर : पतीचा खून, पत्नीसह प्रियकरास जन्मठेप 

लातूर : पतीचा खून, पत्नीसह प्रियकरास जन्मठेप 

Published On: Dec 27 2017 8:45PM | Last Updated: Dec 27 2017 8:45PM

बुकमार्क करा
प्रतिनिधी : लातूर 

सालगड्यासमवेत असलेल्या शरीरसंबधात पतीचा अडसर येऊ नये म्हणून सालगड्याच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास येथील न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयाची शिक्षा ठोठावली. 

आश्विनी अरुण देशमुख व सचिन प्रल्हाद कांबळे अशी त्यांची नावे असून, ते लातूर तालुक्यातील चिकलठाणा या गावचे रहिवाशी आहेत. १५ मार्च २०१४ रोजी ही घटना घडली होती. आश्विनी देशमुख हिचे पती अरुण यांच्या शेतावर गावातील सचिन कांबळे हा सालगडी म्हणून कामास होता. दरम्याम आश्विनीचे सचिनशी प्रमसबंध जुळले. आपल्या प्रेमसंबधात आपला पती अडसर ठरु शकतो, अशी तिला शंका आली व तिच्या मनात सैतानी विचार घोंगावू लागले. शेवटी तिने पतीचाच काटा काढायचे ठरवले. सचिन संधीची वाटच पहात होता. १४ मार्च रोजी अरुणच्या भावकीत कंदुरीचा कार्यक्रम होता.  त्यासाठी अरुण व सचिनही जेवणासाठी शेतावर गेले होते. जेवन झाल्यानंतर  रात्री साडेआठच्या सुमारास अरुण त्याच्या शेतावर गेला तर सचिन गावात परतला. त्यानंतर सचिन  कुऱ्हाड घेऊन शेतावर आला व त्याने अरुणवर कुऱ्हाडीचे  घाव घातले. यात तो गतप्राण झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिला व पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर ग्रामिण पोलिस ठाण्याचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक गजानन भातलंवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रफिक सय्यद  यांनी घटनास्थळ पंचनामा केला व तपासचक्रे गतीमान केली. गावात आश्विनी व सचिनच्या संबधाची चर्चा होती. 
त्यावरुन सचिनला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रारंभी आडेवेढे घेणारा सचिन पोलिसी हिसक्यापुढे सुतासारखा सरळ झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

त्यानंतर आश्विनीलाही ताब्यात घेतले व तिनेही गुन्हा कबुल केला.  न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. न्या. ए. एन पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. १४ साक्षिदार तपासण्यात आले. या खटल्यात पत्नीस व तिच्या प्रियकरास न्यायालयाने जन्मठेप सुनावली.