Fri, Jul 19, 2019 05:15होमपेज › Marathwada › सामाजिक उपक्रमाने विलासराव देशमुखांची जयंती साजरी

सामाजिक उपक्रमाने विलासराव देशमुखांची जयंती साजरी

Published On: May 26 2018 5:40PM | Last Updated: May 26 2018 5:40PMप्रतिनिधी  :  लातूर

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची ७३ वी जयंती शनिवारी शहर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. बाभळगाव येथील विलासरावांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता.

बाभळगाव येथे समाधिस्थळी सकाळी ९ वाजता सामुहिक प्रार्थना सभा झाली. त्यानंतर डॉ. राम बोरगावर व कलाकारांनी  स्वरवंदना सादर केली. स्वरवंदनेनंतर देशमुख परिवाराच्या वतीने समाधीवर पुष्पअर्पण करण्यात आले. विलासरावांच्या पत्नी वैशाली ताई, दिलीपराव, सुवर्णाताई, आमदार अमित , रितेश, धीरज देशमुख , अभिजीत देशमुख सत्यजीत देशमुख यांनी  पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. खासदार डॉ. सुनिल गायकवाड, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार त्र्यंबक भिसे, शिवसनेचे संपर्क प्रमुखअभय साळुंके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीकांनी अभिवादन केले.

Image may contain: 1 person, smiling, indoor

Image may contain: 8 people

काँगेस भवन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विकास बँक, मांजरा सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, जागृतीसाखर कारखाना येथेही अभिवादन झाले. विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले तसेच वृक्षारोपन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक संस्था व विलासरावांच्या चाहत्यांनी रक्तदान शिबीरे, सर्वरोग निदान व उपचार शिबीरे घेतली. शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. अन्नदानही करण्यात आले.

सोशल मीडियावरुनही अभिवादन 

लातुरात विकासाची गंगा आणणाऱ्या व विरोधकांशीही मैत्रिचे नाते ठेवणाऱ्या या नेत्याच्या आठवणी जंयती दिनी लोकमनात जागल्या. लोकमनातील हा आदर फेसबुक, वॉटसअॅप, टिव्टीरवर विलासरावांची छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ व व्हीडीओ क्लीप्स शेअर करुन चाहत्यांनी व्यक्त केला.