Fri, Apr 26, 2019 17:26होमपेज › Marathwada › लातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

लातूर : चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

Published On: Jun 27 2018 5:12PM | Last Updated: Jun 27 2018 5:12PMलातूर : प्रतिनिधी   

लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश बाबूराव चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना आज बुधवारी लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील आरोपींत प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, महेशचंद्र प्रभाकरराव घोगडे, करण चंद्रपालसिंग गहिरवार, शरद सुर्यकांत घुमे, अक्षय भिवा शेंडगे यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड चंदनकुमार असून, त्यानेच अविनाशची हत्या करण्यासाठी २० लाखाची सुपारी देऊ केल्याचे तपासात उघड झाले आहे.

त्यातील साडेआठ लाख आरोपींना मिळाले होते. २४ जून रोजी रात्री लातूर येथील शिवाजी शाळेनजिक अविनाश यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला होता.