Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Marathwada › जावयाने घेतला सासऱ्याच्या नाकाचा चावा

जावयाने घेतला सासऱ्याच्या नाकाचा चावा

Published On: Jun 17 2018 4:42PM | Last Updated: Jun 17 2018 4:42PMप्रतिनिधी : लातूर

मारहाण करीत असलेल्या जावायाच्या तावडीतून लेकीची सुटका करण्यास गेलेल्या सासऱ्याच्या नाकाचा जावायाने कडाडून  चावा घेतल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. यात सासऱ्याच्या नाकाचा शेंडा तुटला. लातूर जिल्ह्यातील भादा या गावी शनिवारी ही घटना घडली. संतोष यादव असे जावायाचे नाव असून, त्याच्याविरुध्द भादा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भादा येथिल रहिवासी नागनाथ शिंदे यांच्या मुलीचे लग्न संतोष यादव याच्याशी झाले होते. संतोष हा आचारी असून त्याला दारुचे व्यसन आहे. तो त्याच्या पत्नीला सतत मारझोड करीत असल्याने या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी आली होती. तिला नेण्यासाठी तो भादा येथे दारू पिऊन आला होता.

परंतु तिने नकार दिल्याने पती-पत्नीत वाद झाला व संतोषने तिला सासऱ्यासमक्ष मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी  सासरे भांडण सोडवण्यास पुढे गेले असता, त्यांनाही संतोषने जुमानले नाही. त्‍यांनाही धक्‍काबुक्‍की करत त्यांच्या नाकाचा चावा घेतला. या संतोषने हा चावा इतक्‍या जोरात घेताला की यात सासरेबुवांच्या नाकाचा शेंडाच तुटला. तुटलेल्या नाकाचा शेंडा घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत सासऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले व जावायाविरोधात फिर्याद दिली.