Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Marathwada › शिवशाहीला लातूर नजीक अपघात,एक प्रवाशी गंभीर

शिवशाहीला लातूर नजीक अपघात,एक प्रवाशी गंभीर

Published On: Jun 17 2018 4:16PM | Last Updated: Jun 17 2018 4:15PMलातूर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज रविवारी पहाटे अपघात झाला. भरधाव वेगातील ही बस मुरूड ( ता.लातूर)  नजिक एका पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसमधील एक प्रवाशी बाहेर फेकला गेला. यावेळी तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमएच ०३ सीपी ४५४४ ही कोल्हापूर-नांदेड शिवशाही लातूर मार्गे नांदेडकडे येत होती. ती मुरुड शहरानजीक असलेल्या नाल्यावरील पुलाजवळ आली असता, चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस थेट पुलाच्या कठड्यावर घुसली. काही फूट तसीच पुढे जाऊन बस पुलावर लटकली यावेळी बसच्या दारात उभा असलेला प्रवासी राजेश गणपत देवसरकर (रा.देवसरी ता.उमरखेड जि.यवतमाळ हा. मु. पंढरपूर) हा वेगाने बाहेर फेकला गेला. तर बसमधील प्रवाशांनाही किरकोळ मार लागला. गणपत देवसकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू पकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बसमध्ये तेरा प्रवाशी होते. अपघाताची माहिती कळताच त्या परिसरातील नागरीक अपघात स्थळी धावले व त्यांनी संकटकालीन खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढल्याचे मुरुड पोलिसांनी सांगितले.