Sat, May 30, 2020 13:19होमपेज › Marathwada › लातूर : न्या. लोया मृत्यू चौकशीसाठी वकिलांचा मोर्चा

लातूर : न्या. लोया मृत्यू चौकशीसाठी वकिलांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

लातूरचे सुपुत्र तथा सोहराबुद्दीन खटल्याचे तत्कालीन न्यायाधीश ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्यूची सर्वोच्य न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राष्ट्रपती, सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमुर्ती यांना सादर करण्यासाठीचे मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सुमारे १२०० वकील त्यात सहभागी झाले होते. न्यायमूर्ती लोया यांना न्याय द्या, लोया यांच्या मृत्यूची चौकशी करा, असे फलक त्यांच्या हातात होते. न्या.लोया यांच्यावर एका प्रकरणात वरिष्ठ न्यायाधिशांचा दबाब असल्याची शंका घेतली जात होती. ते तणावाखाली होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पोस्टमोर्टमची कल्पना त्यांच्या परीवारास न देणे, तीन दिवसानंतर त्यांचा मोबाईल व अन्य साहित्य त्यांच्या परिवारास देणे , मोबाईलमधला मजकूर वगळणे या बाबी संशयास्पद आहेत. ही पार्श्वभूमी पहाता लोया यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय त्यांच्या परिवारास व वकील मंडळास आहे, त्यामुळे चौकशीची मागणी केल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रिजमोहन लोया हे लातूर तालुक्यातील गातेगावचे रहिवासी होते. त्यांनी लातुरच्या न्यायालयात सुमारे आठ वर्षे वकीली केली होती. ते सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मुंबई येथे कार्यरत असताना सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने  गुजरात मधील सोहराबबुद्दीन एन्काऊंटर प्रकरण महाराष्ट्राकडे वर्ग करण्यात आले होते. उत्पात नावाचे न्यायाधीश यांच्या न्यायालयात ते सुरू होते. त्यानंतर त्यांना बदलण्यात येऊन त्याजागी लोया यांची नियुक्ती करण्यात आली होती. ३० नोव्हेबर २०१४ रोजी न्या. लोया हे एका सहकारी न्यायाधीशांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपुरात गेले होते. त्या रात्री हद्य विकारांच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते.