Thu, Feb 21, 2019 09:05होमपेज › Marathwada › आईसह २ मुलींची 'गोदावरीत' आत्महत्या

आईसह २ मुलींची 'गोदावरीत' आत्महत्या

Published On: Jun 23 2018 6:26PM | Last Updated: Jun 23 2018 6:26PMकुंडलवाडी : प्रतिनिधी 

शेळगाव जवळील गोदावरी नदीत आज शनिवार दि.23 जुन दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आईने दोन मुलींसह नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची  दुर्दैवी घटना घडली.कुंडलवाडी येथील आचारी काम करणारे यादव कांबळे यांची दुसरी पत्नी पुजा यादव कांबळे ( वय 35) हिने आपल्या दोन मुली शिवानी यादव कांबळे(वय7), व सुविद्या यादव कांबळे (वय3) यांना घेऊन शेळगाव येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.

पुजा हि दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती अशी माहिती मिळत आहे. सुविद्या या मुलीचा मृतदेह दुपारी चार वाजेच्या सुमारास सापडला असुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहीती सहायक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.