Mon, Apr 22, 2019 12:34होमपेज › Marathwada › आरोपीला पकडताना पोलिसांवरच झाला हल्‍ला

आरोपीला पकडताना पोलिसांवरच झाला हल्‍ला

Published On: Jan 15 2018 6:19PM | Last Updated: Jan 15 2018 6:28PM

बुकमार्क करा
किल्लेधारुर : वार्ताहर 

आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्‍या पोलिसांवरचं हल्‍ला झाल्‍याची घटना घडली. हा प्रकार बीड तालुक्यातील पिंपळनेर या ठिकानी घडला. अनेक गुन्ह्यात सक्रीय असलेल्‍या एका आरोपीचा पालिस गेले अनेक दिवस शोध घेत होते. मात्र त्‍याला पकडणे पोलिसांचा शक्‍य झाले नव्हते. या आरोपीला आज पकडायचे या हेतूने पोलिस गेले खरे पण पोलिसांवरच काढता पाय घेणे भाग पडले. 

त्‍याचे झाले असे, धारुर  पोलीस स्टेशनचे स पो नि चंद्रकांत घोळवे , केळे एन व्ही,पो कॉ भडाने, आर टी व पोलीस पाटील हे गांवदरा येथील लमान तांड्यावर रविवारी संक्रांतीच्या दिवशी आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक करून त्‍याला पोलिस जीपमधुन घेउन जात असताना, अचानक पुरूष व महिलांचा सुमारे वीस जनांचा जमाव पोलीसांच्याचं गाडीवर चालून आला. हा जमाव इतक्‍यावरचं न थांबता यातील लोकांनी जाळून टाका म्‍हणत  पोलिसांच्याच जीप गाडीवर रॉकेल ओतून गाडी पेटवण्याचा प्रयत्‍न केला. तसेच पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. यावेळी पोलिसांना ऊसाच्या कांडक्‍यानेही मारहाण केली. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे पोलिसही काहीवेळ भांबाउन गेले. या गोंधळाचा फायदा घेत अनेक गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्यात यशस्‍वी झाला. इतर आरोपीनींही यावेळी पळ काढला. या परिस्‍थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी येथुन काढता पाय घेतला.   

या प्रकरणी धारुर  पोलिस ठाण्यात पोलीस सहायक निरीक्षक चंद्रकांत घोळवे यांनी दिलेल्या  फिर्यादी वरून आरोपी भाऊसाहेब भानदास राठोड,मधूकर राठोड,विघे राठोड व  साहेब राठोड, वसंता राठोड,यमूना राठोड,शारदा ,कविता,वनिता राठोड आणि ईतर पुरुष आणि महिला यांच्या विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र या घटनेमुळे पोलिसांची भीती राहीली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत असून, या घटनेची परिसरात चविष्ट चर्चा केली जात आहे.