Sat, Mar 23, 2019 18:11होमपेज › Marathwada › केळी जलाशयाच्या पाणीपातळीत घट

केळी जलाशयाच्या पाणीपातळीत घट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औंढा नागनाथ : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यात अनेक छोटी-मोठी तलाव आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाल्याची दिसून येत आहे. 

या भागातील केळी जलाशयाचे पाणीपातळीत सर्वाधिक कमी झाली आहे. सध्या जलाशयात केवळ दोन टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याने तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी परिसरात ऐन उन्हाळ्यात तोंडावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून उन्हाळी हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची चाहूल आतापासूनच जाणवत आहे. परिणामी परिसरातील विहिर, बोअर, हातपंप, तलावातील पाणी पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरपासून भटकंती होताना दिसून येत आहे. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमूग घेतल्या जाते. मात्र यंदा तलावासह विहिर, बोअर आदींचे पाणी कमी झाल्याने पर्यायाने भुईमुगाची पेरणीही कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील केळी तलावासह सिध्देश्‍वर धरणात देखील पाणी पताळी झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळी व सिध्देश्‍वर धरण क्षेत्रातील शेतकर्‍यांना मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच येलदरी जलाशयात देखील तीन ते चार टक्केच पाणी साठा असल्यामुळे दोन्ही धरणे यावर्षी कोरडी झाली आहेत. गेली दोन ते तीन महिन्यापासून या परिसरातील पूर्णा नदीला पाणी नसल्यामुळे नदी देखील कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे जनावरांसह वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यंदा सर्वाधिक पाऊस पडावा यासाठी बळीराजा आतापासूनच देवाला साकडे घालीत आहे. 


  •