Thu, Jun 20, 2019 00:56होमपेज › Marathwada › बीडः अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार

बीडः अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार

Published On: Mar 23 2018 10:06AM | Last Updated: Mar 23 2018 10:08AMकेजः प्रतिनिधी

दहावीची परीक्षा देण्यासाठी माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचोली पाटीजवळ घडली. अजित दिलीपराव नागरगोजे (वय 25) असे मयत तरूणाचे नाव आहे. अजितचे लग्न दीड महिन्यांपूर्वीच झाले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील कोरेगाव येथील अजित नागरगोजे हा पत्नी भेटण्यासाठी माहेरी निघाला होता. दहावीची परीक्षा देण्यासाठी त्याची पत्नी साळेगाव येथे माहेरी गेली होती. पत्नीचे दहावीच्या परीक्षेचे सगळे पेपर झाल्याने अजित तिला भेटण्यासाठी निघाला होता. 

गुरुवारी रात्री कोरेगाव येथून रात्री नऊच्या सुमारास साळेगावकडे जात असताना केज पासून दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली पाटीजवळील अस्वले यांच्या शेताजवळ त्याच्या मोटारसायकला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळाहून पोबारा केला.  दरम्यान अजितच्या मोटारसायकला डस्टर कारने धडक दिल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 Tags : kej taluka, two wheeler, accident, young man, death