Wed, Nov 21, 2018 23:28होमपेज › Marathwada › बीड : मस्साजोगजवळ ट्रक्‍टर अपघातात दोघांचा मृत्‍यू

बीड : मस्साजोगजवळ ट्रक्‍टर अपघातात दोघांचा मृत्‍यू

Published On: Mar 22 2018 9:50AM | Last Updated: Mar 22 2018 9:10AMकेज : प्रतिनिधी

केजहून काळेगावकडे जात असलेल्या ट्रॅक्टरचे पुढील चाक फुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील दोघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. ही घटना मस्साजोगजवळ रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

तालुक्यातील काळेगाव येथील वसंत शाहूराव कोठावळे (वय ४५) हे केज येथून ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करुन सायंकाळी सात वाजता काळेगावकडे जात होते. यावेळी दिनकर व्यकंट घुले ( वय ५०, रा.केळगाव) यांना सोबत घेऊन जात होते. मस्साजोगजवळ ट्रॅक्टरचे पुढील चाक फुटल्याने वसंत कोठावळे यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुच्या खड्ड्यात गेले. यामध्ये वसंत शाहूराव कोठावळे, दिनकर व्यकंट घुले हे दोघे जागीच ठार झाले. याप्रकरणी केज पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.