Sat, Feb 23, 2019 10:12होमपेज › Marathwada › परभणी : जीप उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर 

परभणी : जीप उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर 

Published On: Jun 27 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 9:01PMगोळेगाव : प्रतिनिधी

कु्रझर जीप उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजेच्या  सुमारास औंढा - गोळेगाव रस्त्यावरील वॉटर फिल्टरजवळ घडली. कृष्णा पवार (रा. गोळेगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. समोरून भरधाव ट्रक अचानक जीपच्या (क्र. एमएच 26 व्ही 3153) दिशेने येत होता. दरम्यान, अपघात होऊ नये म्हणून क्रुझर चालकाने रस्त्याच्या खाली जीप घेण्याच्या नादात जीप उलटली. यात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान, अचानक समोरून भरधाव  ट्रक अंगावर येईल, या भीतीपोटी जीपचालक कृष्णा पवार याने आपली जीप खाली घेऊन पुन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र जीपवरील ताबा सुटल्याने ती उलटली. या घटनेत चालक जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत  क्रुझर जीपचे जवळपास सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. जीपमध्ये चालक एकटाच असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र जीपचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.