Thu, Apr 25, 2019 06:09होमपेज › Marathwada › लातूरच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन मध्ये यश

लातूरच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन मध्ये यश

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 10:29PMलातूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या जेईई - २०१८ या परीक्षेत लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या संस्‍थेचे १४५ विद्यार्थी पात्र झाले आहेत. निकालाची टक्केवारी ५०.८७ अशी आली आहे. यशस्वीतांत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल व राजर्षी शाहू ज्यूनिअर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १४५ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले.

संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलची ऋतुजा भगवान केंद्रे ही ओबीसी प्रर्वगातून २४६व्या क्रमांकावर झळकली. नदीम निजाम शेख याने सर्वसाधारण गटात १९७६ वा क्रमांक मिळवला. याच प्रवर्गात मंगेश शिवाजी चंद्रबन्सी २४९८ क्रमांकावर पोहचला. अनुसुचित जमाती प्रवर्गातून प्रमोद किशनराव वजीरे याने ८७ वा क्रमांक मिळवला. ३० विद्यार्थ्यांना १५० पेक्षा अधिक गुण मिळाल्याचे राजर्षी शाहू ज्यूनिअर सायन्स कॉलेजच्या उपमुख्य समन्वयक  प्रा. सतीश पवार यांनी सांगितले.