Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जळगावात पहिला पाणी मगच मतदान

जळगावात पहिला पाणी मगच मतदान

Published On: Aug 01 2018 11:46AM | Last Updated: Aug 01 2018 12:03PMजळगाव : प्रतिनिधी 

आज महाराष्ट्रात दोन जिल्ह्यात महानगरपालिकांसाठी मतदान सुरु आहे. सांगली आणि जळगाव महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सांगलीत मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यांनी मतदान केंद्रात रांगोळी काढून रोशनाई करुन मतदान प्रक्रियेला उत्सवाचे स्वरुप दिले आहे. तर जळगावमध्ये पावसाळ्यातही पाण्याचा यक्ष प्रश्न असल्याने येथील नागरिकांनी बऱ्याच दिवसांनी पाणी आल्याने पाण्याला प्राथमिकता दिली.

वाचा : सांगलीत मतदान केंद्रे झाली चित्रमय; मतदानाला ‘लोकशाही उत्सवाचे’ स्वरुप

आज जळगाव महानगरपालिकेतील काही भागात तीन दिवसानंतर नियमित पाणी पुरवठा होते आहे. आज हुडको कॉलनी, विजय नगर, श्रीकृष्ण कॉलनी, खडेरावनगर, पिप्राळा कॉलनी या भागात पाणी पुरवठ्याचा दिवस असल्याने मतदार मतदानासाठी सकाळी बाहेर पडले नाही.  तर दुपारनंतर बजरंग हॉल पाणीसाठी खोलणार असल्याने प्रेम नगर, भोईटेनगर, लक्ष्मीनगर, बेडाळे स्टँप याभागात पाणी पुरवठा होणार आहे.  त्यामुळे मतदार प्रथम पाणी भरण्यावर भर देताना दिसून येत आहेत. त्यानंतर मतदानला जाताना दिसत आहेत. यामुळे सकाळी मतदान केंद्रावर तुरळक लोक दिसत होते.