Wed, May 22, 2019 11:12होमपेज › Marathwada › खडसेंविरूध्द न्यायालयात खटला दाखल

खडसेंविरूध्द न्यायालयात खटला दाखल

Published On: Mar 17 2018 3:59PM | Last Updated: Mar 17 2018 3:59PMजळगाव : प्रतिनिधी 

एन.डी.डी.बीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचा आरोपावरुन ११५ लोकांविरुध्द फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने या खटल्यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. पण, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. 

न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही म्हणून नागराज पाटील यांनी जळगाव न्यायालयात आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पोलिस अधिक्षक, डिवायएसपी, तसेच शासकीय अधिकारी, लेखापाल, विद्यमान संचालक याच्याविरूध्द खटला दाखल केला आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ जळगाव यांचे व्यवस्थापन एन.डी.डी.बीकडे सोपवून प्रशासक नेमला. तसेच एन.डी.डी.बीच्या पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी लोकसेवकांसोबत संगनमत करून कायद्याचे उल्लघंन केले आहे. असा आरोप नागराज पाटील यांनी केला होता.