Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Marathwada › ‘बुद्धी, विद्वत्ता, शौर्याचा संगम म्हणजे संभाजी महाराज’

‘बुद्धी, विद्वत्ता, शौर्याचा संगम म्हणजे संभाजी महाराज’

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 10:54PMमाजलगाव : प्रतिनिधी

भारताच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी तसेच विद्वान महापुरुष होऊन गेले, परंतु बुद्धी, विद्वत्ता आणि शौर्य यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ते व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, असे प्रतिपादन डॉ. केदार फाळके यांनी श्री शिवशंभू विचार दर्शन आयोजित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव व शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाप्रसंगी केले.मॉ वैष्णवी मंगल कार्यालयात श्री शिवशंभू विचार दर्शनने छत्रपती शंभू राजे जन्मोत्सव व श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रा. स्व. संघ तालुका संघचालक गोरक्षनाथ बादाडे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून  आ. आर. टी. देशमुख हे उपस्थित होते. 

यावेळी रा. स्व. संघ विभाग कार्यवाह आनंद गुजर, माजी आ. मोहनराव सोळंके, माजी सभापती नितीन नाईकनवरे, काँग्रेसचे नारायण होके, दिगंबर सोळंके, दिनकर शिंदे, दीपक मेंढके, तुकाराम येवले, हनुमान कदम, नगरसेवक बाळासाहेब होके, मराठा क्रांती मोर्चाचे राजाभाऊ शेजूळ, सत्यनारायण उनवणे, महिला आघाडीच्या शीतल सोळंके, लखन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकर्‍यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याबद्दल राजेंद्र होके यांचा शिवशंभू विचार दर्शनने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आ. आर. टी. देशमुख यांनी शिवशंभूच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. केदार फाळके म्हणाले की, बुद्धी, विद्वत्ता आणि पराक्रम, शौर्याची परिसीमा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय.प्रास्ताविक प्रवीण शेजूळ, सूत्रसंचालन केदार वाघमारे व आभार माउली आहेर यांनी मानले.